From miracles by the Arabian Sea to stories of saints and spirits around wells, the beliefs around water shape the cultural fabric of the city. Several places of worship and the deities that they house find their existence in local stories, and to this day millions continue to throng their gates in faith and search for miracles.
अरबी समुद्र आणि शहरातील विहिरी, पाणवठे यांच्याशी निगडित अनेक आख्यायिका, पाण्याबाबतच्या अनेक श्रद्धा-अंधश्रद्धांनी शहराची सांस्कृतिक वीण बांधली गेली आहे. अनेक प्रार्थना स्थळे आणि तेथील देवी-देवतांचा उल्लेख या कथांमध्ये आढळतो. यामुळेच चमत्कारांच्या आशेने आजही त्यांच्या दरवाज्यापाशी श्रद्धाळूंची गर्दी कायम आहे.