By March 2020, the words ‘Covid-19’ and ‘Pandemic’ were a part of our everyday vocabulary. The country went into a severe national lockdown and social distancing, wearing a mask and hand washing were part of the precautions we were asked to observe. However, it soon became obvious that the large majority of our population did not have access to safe water or sanitation nor could they work from home in a digitally-enabled world. Our rich water heritage, the livelihoods that depend on water, our practices of faith and culture intersecting with freshwater, stood silent. It was in this silence that we realised the value of community managed water systems, the alienation caused by the convenience of piped water supply systems and the lack of inclusive public health infrastructure. In this gallery we explore the history of public health in Mumbai from the lens of waterborne disease and look at the intersection of Covid-19 hotspots with the most vulnerable informal settlements in the city.
मार्च २०२० पासून कोवीड-१९, पॅंडेमिक (महामारी) हे शब्द आपल्या रोजच्या वापरातील शब्द झाले. देशभरात अत्यंत सक्तीचे निर्बंध घोषित केले गेले.एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे (सामाजिक अंतर) आणि वेळोवेळी नियमितपणे हात धुणे या सारखे खबरदारीचे उपाय अमलात आणण्याचे वारंवार सांगितले गेले. बहुतांश लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही किंवा शौचालये देखील उपलब्ध नाहीत, तसेच आज काळच्या डिजिटल युगातही घरून काम करणे ही त्यांना शक्य नाही, हे काही दिवसातच स्पष्ट झाले. आपला पाण्याचा समृद्ध वारसा, पाण्यावर अवलंबून असलेली उपजीविकेची साधने, व्यवसाय, शुद्ध पाण्याशी सांगड घालणारी आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीतील विधी, सगळं अचानक ठप्प झाले. या सगळ्यामुळेच आपल्याला पाण्याच्या सार्वजनिक जागांचे महत्त्व, जलवाहिन्यांनी होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील सोयींसोबत येणारे समाजातील दुरावलेपणा या आणि सर्वसमावेशक सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचा अभाव या गोष्टी ठळकपणे जाणविल्या. या प्रदर्शनात, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या रोगांचा आढावा या बरोबर आपण मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अढावादेखील घेऊ आणि सोबतच मुंबईतील असुरक्षित आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्त्या आणि कोविद-१९चा प्रसार यांच्या परस्पर संबंधांवर प्रकाश पाडण्याचा प्रयत्न ही करू.