SCROLL
EXHIBIT — WATER AND CULTURE

Confluence Events
March 2021

MON

22

Water &
Built Heritage

TUE

23

Water &
Culture

WED

24

Water &
Livelihoods

THR

25

Saline Waters

FRI

26

Water & Equity

Confluence Events - March 2021

CURATORIAL NOTE

Water Stories of Mumbai

Re-thinking Urban Waterscapes

Woven together by land reclaimed from the sea, the seven islands that now comprise peninsular Greater Mumbai have a complex relationship with water. From ancient wells, tanks and public fountains built by philanthropists of all faiths, to the Koli fishing communities struggling to retain their livelihoods, from the tanker economy servicing high-rise apartments to the everyday water vulnerabilities faced by informal settlements, from rivers, such as the Mithi, encroached by urban expansion to the ambitious coastal road, Mumbai’s waters speak of diverse confluences.

In a year marked by a global pandemic, more than 30 professionals – water researchers, artists, conservation architects, photographers, designers, social scientists and urban planners - came together to launch the Mumbai Water Narratives. They documented Mumbai’s water journey from heritage to health, through storytelling, new media design, technology and the arts to engage our youth as future waterkeepers. Confluence is their first virtual exhibition designed as six thematic galleries connected to water:

built heritage, culture and faith, livelihoods, saline waters, access to water and public health. The exhibition is supported by curated walks, panel discussions, films and music to begin a conversation on our shared waters, asking each of us to reflect on our actions amidst growing structural inequality. In what small way can we each contribute to the water wisdom we have inherited so that we can ensure a sustainable and just water future for our children?

We would like to acknowledge the commitment and passion of all our content partners and contributors, the local communities and artists they have interacted with throughout the city and the Metropolitan Mumbai Region, and our design and development team for meeting our tight deadlines effectively. While we have tried to include and imbibe as many perspectives within our narratives, Confluence is only the first step towards facilitating citizens dialogue to address issues of access, equity and the impacts of climate change on Mumbai’s coastline. We hope to build a larger repository of narratives through your help and support.

Sara Ahmed, Minaz Ansari, Ipshita Karmakar

Core curatorial team of Mumbai Water Narratives

मुंबईच्या पाण्याच्या गोष्टी

पुनर्विचार अर्बन वॉटरस्केप

समुद्रात भर टाकून सांधल्या गेलेल्या सात बेटांच्या या मुंबई महानगराचे आणि पाण्याचे एक विलक्षण नाते आहे. प्राचीन विहिरी, तळी आणि विविध धर्मिय दानशूर व्यक्तींच्या अर्थ साहाय्याने बांधलेल्या सार्वजनिक पाणपोई ते आपल्या उपजीविकेच्या साधनांचे रक्षण करू पाहणारा कोळी समाज, उंच इमारतींना टँकरने पाणी पुरवठा करणारे ते रोज पाणी संकट झेलणाऱ्या अनियोजित वस्त्या, मिठी नदी सारख्या नदीवरील वाढत्या शहरीकरणामुळे झालेले अतिक्रमण ते महत्त्वाकांक्षी‍ सागरी महामार्ग, मुंबईच्या पाण्याचे असे विविध प्रश्न आपल्यासमोर एकाच वेळी उभे राहतात.

जागतिक महामारीमुळे चर्चिल्या गेलेल्या या गेल्या वर्षात ३०हुन अधिक व्यावसायिकानीं - जल संशोधक, कलाकर, पुरातन वास्तुंचे जतन-संवर्धन करणारे वास्तुविशारद , छायाचित्रकार, डिझायनर्स, समाज शास्त्रज्ञ आणि शहर नियोजक- एकत्र येऊन ‘मुंबई वॉटर नॅरेटिव्हस’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. पुरातन वास्तुकलेपासून ते आजच्या निर्वाणीच्या आरोग्य या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी मुंबईच्या जल संस्कृतीचा माहितीपट कथामाध्यम, आधुनिक मिडीया डिझाईन्स, तंत्रज्ञान आणि उद्याचे पाणी रक्षक असणाऱ्या आजच्या तरुण वर्गाला आकर्षित करतील अशा कलाकृतींद्वारे आपल्या समोर उभे केले आहे. स्थापत्यशात्र, श्रद्धा आणि संस्कृती, उपजीविकेची साधने, खारे पाणी, पाणी हक्क आणि सार्वजनिक आरोग्य अशा सहा विषयांवर आधारित 'कॉन्फ्लुएन्स' हे त्यांचे पहिले आभासी प्रदर्शन आहे.

डोळस नजरेतून आपल्या शहराचा घेतलेला आढावा, चर्चा, चित्रपट आणि संगीत अशा विविध मार्गाने सार्वजनिक जलव्यवस्थापन, वाढत्या असमानतेमुळे निर्माण झालेली तफावत कमी करण्यासाठीचे व्यक्तिगत पातळीवरील प्रयत्न या सारख्या प्रश्नातून अवलोकन केले गेले. त्यातून एक मुख्य प्रश्न समोर आला. ‘आपल्याला मिळालेल्या जलसंस्कृतीच्या वारशाचे जतन करून आपल्या पुढच्या पिढ्यांना अविरत जलसंपदा देण्यासाठी आपण वैयक्तिक काय योगदान देऊ शकतो?’

या वाटचालीत अनेक जणांचा सहभाग आहे. अत्यंत एकनिष्ठेने आणि पूर्णपणे समरस होऊन माहितीपट निर्माण करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व व्यावसायिकांचे, मुंबई या महानगरातील ज्या स्थानिक रहिवासी व कलाकारांशी त्यांनी संवाद साधला त्यांचे, वेळेचे गणित सांभाळत उत्तम सादरीकरण निर्माण करणाऱ्या आमच्या डिझाईन टीमचे आम्ही मनापासून आभारी आहोत. या कथा विवेचनाद्वारे जास्तीत जास्त विचारधारा समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न असला, तरी 'कॉन्फ्लुएन्स' या प्रदर्शनाद्वारे पाण्याचा समान न्याय आणि हक्क, तसेच जागतिक पातळीवर होत असलेल्या हवामान बदलाचा मुंबईच्या समुद्र किनाऱ्याला असलेला धोका या कडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही उचलेले हे पहिले पाऊल आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने हे माहितीचे विश्व अधिकाधिक समृद्ध होईल असा आम्हाला विश्वास आहे.

सारा अहमद, मिनाझ अन्सारी, इप्शीता कर्माकर

मुंबई वॉटर नरेटीव्ह्जची कोर क्युरेटोरियल टीम

SCROLL

FEATURED GALLERY

Our Partners

INSTAGRAM