The built heritage of Mumbai City often speaks to us in codes and ciphers, leaving clues and traces of its connections with water. A major trading port, Mumbai evolved into the Urbs Prima in Indis (India’s primary city) under the British Empire and the built form that evolved showcased the connections to its waters embedded into urban morphology.
A slow discovery of the city reveals a museum of urban artefacts related to various trades, cultural identities and faiths, along its celebrated heritage buildings, chaotic bazaars, narrow gullies and bustling villages, creating polaroid picture moments and narrating stories of the various connections that the city and its people have had with its waters over time.
मुंबई शहराचे पाण्याशी असलेले नाते येथील पुरातन वास्तु अनोख्या रीतीनें अधोरेखित करतात. ब्रिटिश अमलाखाली मुंबई हे प्रमुख व्यापारी बंदर म्हणून उदयास आले. 'अर्ब्स प्रायमा इन इंडिज’ (भारतातील एक प्रमुख शहर) म्हणून वाढ होत असताना पाणी आणि या शहराचा संबंध शहराच्या नकाशाचा एक अविभाज्य भाग बनला.
इथे जरा शोधक नजरेने फिरलो तर पावलो पावली अनेक व्यापारी, सांस्कृतिक आणि धार्मिक जडणघडणींचे एक चालतं बोलतं संग्रहालय आपल्या समोर उलगडते. कधी नावाजलेल्या ऐतिहासिक वास्तु तर कधी गजबजलेले बाजार, कधी अरुंद गल्ली बोळ तर कधी गावठाणं आपल्यासमोर हे शहर आणि येथील नागरिक यांचा पाण्याशी असलेल्या संबंधाच्या अनेक गोष्टी तुमच्या समोर उभ्या करतात.