Ek Bagal Mein Chand Hoga Ek Bagal Mein Rotiyan (One Side Lies the Moon, On the Other Lies the Bread). As the title suggests, the project begins by looking closely at the two faces of the moon. It refers to the Koli (fishermen) community’s dependence on the moon, to the literal, functional and symbolic meanings attached to it by the Son Koli tribe, when local livelihoods and traditions are on the verge of extinction. In an effort to reverse this sense of loss and dying of indigenous resources, trades, and ecosystems, the women of Chendani fishing village and Parag Tandel are developing a Dry Seafood Recipe manuscript with narratives of loss and shift in occupation.
Drying infers loss, yet the action itself suggests the need to preserve. On this occasion, the women and Tandel will present an archive of recipes, a manuscript recording the survival of these dishes and carrying personal narratives, memories and illustrations of a landscape that has succumbed to pressures of uncontrolled growth. To accompany the manuscript, the community will launch an online video series in the exhibition by using Instagram IGTV. The project thus becomes a symbolic chronicler of the past – as the artist calls it.
'इक बगल में चॉंद होगा एक बगल में रोटियॉं', या शीर्षकाप्रमाणेच हा प्रकल्प चंद्राच्या दोनही रूपांचा अभ्यास करण्यानेच सुरु होतो. स्थानिकांची उपजीविकेची साधने आणि संस्कृतींचा ऱ्हास होण्याच्या मार्गावर असतानाच, व्यवसायाच्या दृष्टीने व शब्दशः आणि प्रतीकात्मक अर्थाने कोळी समाजाचे चंद्राशी असलेले अनोखे नाते आजही तितकेच घट्ट आहे. पारंपरिक संसाधने, व्यापार आणि पर्यावरण यांची होत असलेली हानी भरून काढण्यासाठी ‘चेंदणी’ कोळीवाड्यातील स्त्रिया आणि पराग तांडेल प्रयत्नरत आहेत.
मासे सुकविल्यानेच त्यांचे आयुष्य वाढते असे म्हणायला खरं तर हरकत नाही. या प्रदर्शनाच्या निमित्ताने या सगळ्याजणी आणि तांडेल, अशाच जतन करण्यायोग्य पारंपरिक पाककृतींचा खजिना तुमच्यासमोर ठेवतील. त्या सोबतच त्यांच्याशी जोडलेल्या अनेक आठवणी, किस्से आणि सोबतच अनियंत्रित वाढीला बळी पडत असलेली परंपरा तुमच्या समोर उभी करतील. नुसतेच लेखणीच्या माध्यमातूनच नाही तर InstagramTV या आधुनिक दृक्श्राव्य माध्यमातून देखील या तुमच्या समोर येणार आहेत. हे सगळे कलाकार म्हणतात, तसा एक प्रतीकात्मक ऐतिहासिक दस्तऐवज तुमच्यासमोर उलगडणार आहे.